
बांदा : रोटरी क्लब ऑफ बांदाचा २०२५ - २६ या वर्षासाठीचा नवीन पदग्रहण सोहळा बांदा इथं उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शिवानंद भिडे यांनी अध्यक्षपदाची, स्वप्निल धामापुरकर यांनी सचिवपदाची तर सुदन केसरकर यांनी खजिनदाराची जबाबदारी स्वीकारली. या कार्यक्रमाचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी अमित मेटे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राजेश घाटवाल, डॉ. विद्याधर तयशेटे आणि डॉ. विनया बाड उपस्थित होते.
नवीन जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी दिगंबर गायतोंडे, क्लब ट्रेनर मंदार कल्याणकर, सीताराम गावडे, क्लब लर्निंग फॅसिलिटेटर प्रमोद कामत, कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर आनंद गावस, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी अप्पा चिंदारकर, फाउंडेशन चेअर मनसुख वसानी, सर्जंट ॲट आर्म्स हनुमंत शिरोडकर, सॅनिटेशन चेअर दिलीप घोगले, सदस्य विभाग प्रमुख नरसिंह काणेकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख स्वागत नाटेकर, आणि बुलेटिन संपादक म्हणून विराज परब यांची निवड करण्यात आली. यावेळी यशवंत आळवे, साईराज साळगावकर आणि दत्ताराम पावसकर यांचा क्लबमध्ये नवीन सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.
या कार्यक्रमात समाजसेवक प्रभाकर शिरसाट आणि डॉ. संजय बर्वे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षणात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संतोष सावंत, स्वागत नाटेकर, आप्पा चिंदरकर, सिद्धेश पावसकर, सुधीर शिरसाट, प्रवीण शिरसाट, आनंद गावस, योगेश परुळेकर, नरसिंह काणेकर, आबा धारगळकर, दिलीप घोगले, दिलीप कोरगावकर, डॉ. एन. नाईक, प्रसाद सातार्डेकर, रत्नाकर आगलावे, शीतल राऊळ, फिरोज खान, रवी गवस यांसह अनेक रोटरी व रोटरॅक्ट सदस्य व कुटुंबीय तसेच सर्व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.