बांदा नं. १ केंद्रशाळेचे मुख्याध्यापक आजगावकर यांचा सदिच्छा समारंभ

Edited by: विनायक गावस
Published on: July 02, 2023 18:08 PM
views 111  views

बांदा : जिल्हा परिषद बांदा  नं. १ केंद्रशाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्रीकांत विठ्ठल आजगावकर आपल्या शैक्षणिक सेवेची ३५वर्षे पूर्ण केल्यानंतर वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ येथे त्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

बांदा गावच्या सरपंच अपेक्षा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेला सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ अविस्मरणीय असा झाला.यावेळी पोलिस पोलिस निरीक्षक  शामराव काळे, ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट,तनुजा वराडकर, रत्नाकर आगलावे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, सदस्य संतोष बांदेकर, सेवानिवृत्त शिक्षिका सरोज नाईक, सेवानिवृत्त प्राध्यापक शरद नाईक, केंद्रप्रमुख संदीप गवस , उमांगी मयेकर,जय भोसले आदी मान्यवरांचा  उपस्थितीत मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर व त्यांच्या सहचारिणी श्रद्धा आजगावकर यांचा सपत्नीक सन्मानपत्र,शाळा,श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

  यावेळी सरपंच अपेक्षा नाईक यांनी आजगावकर यांच्या कार्याचा गौरव करत सरांच्या कारकिर्दीत शाळेत राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी मेळावा व गुणी शिक्षक गुणवंत शाळा या पुस्तकात शाळेला स्थान मिळाल्याने शाळेचा नावलौकिक वाढविण्यास आजगावकर यांचे मोठे योगदान असल्याचे मत केले.यावेळी पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनीही  पोलिस ठाण्याच्या वतीने आजगावकर यांचा सन्मान करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट, केंद्र प्रमुख संदीप गवस,,सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब,शांताराम असनकर,शरद नाईक यांनी आजगावकर सर यांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

   यावेळी आजगावकर यांच्याकडून शाळेतील सर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना आजगावकर यांनी सांगितले.  बांदा शाळा व ग्रामस्थ  यांनी माझा केलेला सन्मान अविस्मरणीय असल्याने मत व्यक्त केले. या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय ओरस येथेही मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे,समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांनी आजगावकर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील‌ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रसिका मालवणकर, स्नेहा घाडी, जागृती धुरी ,मनिषा मोरे आदि सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.