
सावंतवाडी : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट शाखेतून प्रथम क्रमांक, रिद्धी तळगावकर हिने ९१.८३ टक्के गुण मिळवित प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. यात विज्ञान शाखेतून प्रणव नाईक ९० टक्के द्वितीय संकेत देसाई ८५ टक्के इशा महाजन ८३.३३ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेतून जानवी ठाकूर ८८ टक्के प्रथम, कमल वडार ८७ टक्के द्वितीय, संकल्प गवस याने ८५.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेतून प्रथम सानिया मयेकर ८१ टक्के, द्वितीय तनय केसरकर ७८.५० टक्के तर तृतीय क्रमांक दिपराज सावंत सावंत ७६.५० टक्के गुण मिळवित मिळविला.
व्हर्टिकल्चर शाखेतून नयन डिंगणेकर ५४.१७ टक्के तर अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट शाखेतून प्रथम क्रमांक, रिद्धी तळगावकर ९१.८३ टक्के गुण मिळवित प्रथम, द्वितीय क्रमांक आकांक्षा सावंत ९०.३३ टक्के तर नेहा ठाकूर 90.17% ९०.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी शाखेतून मनोहर गावडे ७६.१७ टक्के प्रथम, द्वितीय क्रमांक गौरेश वालावलकर७४.६७ टक्के तर तृतीय क्रमांक पार्थ चव्हाण ७४.१७ टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक प्राप्त केला.