बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने स्नेहसंमेलन रंगले !

Edited by: संदीप देसाई
Published on: March 28, 2024 12:31 PM
views 82  views

बांदा : जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेतील  २०२३-२४या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनपर कलाविष्कार या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रंगतदार बनले.

  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक बांदा प्रभाग विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत , सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदीप गवस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर,सरोज नाईक, अनुराधा धामापूरकर,प्रदिप सावंत, शिक्षिका वंदना शितोळे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संपदा सिध्दये,हेमंत मोर्ये, संत़ोष बांदेकर,राधिका गवस,दिक्षा ठाकूर माता पालक संघ उपाध्यक्ष तन्वी काणेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

  यावेळी राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत मेडल प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित बनवलेल्या ज्ञानकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चालू शैक्षणिक वर्षांतील आदर्श विद्यार्थी म्हणून दर्पण आनंद देसाई तर आदर्श विद्यार्थीनी म्हणून आर्या पिराजी शिंगडे हिला सन्मानित करण्यात आले.

 यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रमात सादर केलेली विविध नृत्य, नाटके, गायन, दशावतार या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद देत बक्षिसांचा वर्षाव केला. 

सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदिप व बांदा शाळेतून बदली होऊन गेलेल्या शिक्षिका वंदना शितोळे यांनी  शाळेत अभंग बक्षीस योजना सुरू करणेसाठी रोख रक्कम शाळेकडे सुपूर्द केले.  कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक,माता पालक संघ व शिक्षक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.