
बांदा : बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत सीमेवरील भारतमातेची अहोरात्र सेवा बजावत असलेल्या सेनिकांना पोस्टाने राख्या पाठविल्या.
घरोघरी विविध सण ,उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर खडा पारा देत असलेल्या जवानांना मात्र कुठलाही सण नाही की उत्सव नाही देशाचे संरक्षण हे एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन , भाऊबीज अशा सणांची ते आतुरतेने वाट पाहत असतात रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशातील विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्था सीमेवरील सैनिकांना राख्या पाठवून सैनिक हो तुमच्यासाठी अशा भावना व्यक्त करतात .बांदा केंद्र शाळेतील स्काऊट गाईड पथकामार्फत एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी हा उपक्रम राबवून यातून जमा झालेल्या राख्या सैनिकांना पाठवल्या.
शाळेत राबवलेल्या या उपक्रमाला स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील , मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत,स्नेहा घाडी, कृपा कांबळे,जागृती धुरी, मनिषा मोरे,प्रसेनजित, सुप्रिया धामापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.