बांदा केंद्र शाळेत संविधान सन्मान दिन साजरा

विद्यार्थ्यांनी केला संविधान जागर
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 26, 2022 16:34 PM
views 182  views

सावंतवाडी : भारतीय संविधानाला ७३ वर्षे पूर्ण झाली असून भारतीय संविधानाने स्वातंत्र, बंधुता, न्याय, समता, लोकशाही हे अधिकार मिळवून दिले असून या भारतीय संविधानाचा सन्मान दिवस जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर  १ या केंद्रशाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केले. यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांनी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले व संविधानाप्रमाणे आचरण‌ करण्याची शपथ घेतली. यावेळी धीरज सतीश पटेल या विद्यार्थ्यांने बाबासाहेबांची वेशभूषा साकारली होती तर सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर या विद्यार्थ्यांने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. उपशिक्षिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर, जागृती धुरी, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस, रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी केले.