क्रिडा महोत्सवात बांदा केंद्र शाळेला सर्व साधारण विजेतेपद

Edited by:
Published on: December 14, 2023 19:44 PM
views 36  views

बांदा : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बांदा केंद्रस्तरीय  बाल कला ,क्रिडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जिल्हा परिषद बांदा नं.१शाळेने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. विलवडे नं.१ शाळेच्या पटांगणात मैदानी स्पर्धा तर बांदा केंद्र शाळेत समुह गीत , समुह नृत्य ज्ञानी मी होणार या स्पर्धा संपन्न झाल्या.दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात बांदा केंद्रातील १५शाळा सहभागी झाल्या होत्या . यामध्ये बांदा केंद्र शाळेने सर्वाधिक गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले तर विलवडे नं.१शाळेला उपविजेतेपद मिळाले.

बांदा नं.१शाळेने *लहान गटात* मुलगे- खो-खो  प्रथम ,कब्बडी प्रथम, समुह नृत्य प्रथम ,मुली खो-खो प्रथम,रिले प्रथम *मोठा गट* मुलगे खो-खो प्रथम,रिले द्वितीय ,मुली कब्बडी प्रथम, खो खो द्वितीय, रिले द्वितीय ,समुह नृत्य द्वितीय क्रमांक प्राप्त केले.

वैयक्तिक *लहान गटात*- दुर्वांग मांजरेकर ५०मी धावणे द्वितीय, लांब उडी दुर्वांग मांजरेकर तृतीय,चैताली वडर १००मी धावणे प्रथम, बुशरा खान उंचउडी प्रथम, चैताली वडर लांबउडी द्वितीय, *मोठा गट*-  १००मी धावणे यल्लापा करंबळकर द्वितीय, अर्पण सावंत २००मी धावणे प्रथम, उंचउडी यल्लापा करंबळकर द्वितीय,लांबउडी साहिल साळुंखे द्वितीय,१००मी धावणे युतिका बांदेकर द्वितीय , उंच उडी रोहिणी चव्हाण तृतीय ,लांबउडी सनिमुनिशा खान तृतीय ,गोळा फेक त्रिशा गावडे तृतीय यांनी सुयश प्राप्त केले.ज्ञानी मी होणार या स्पर्धेत लहान गटात दुर्वा  नाटेकर व स्वरा  बांदेकर यांनी प्रथम,तर मोठ्या गटात आर्या शिंगाडे व शिवानंद परब यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख संदीप गवस व मान्यवरांच्या उपस्थितीत मेडल व ट्राफी देऊन गौरविण्यात आले.

या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये पदविधर शिक्षिका स्नेहा घाडी , रंगनाथ परब, शांताराम असनकर,जे.डी.पाटीर,प्रदिप सावंत,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत,सपना गायकवाड,जागृती धुरी ,मनिषा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे उपाध्यक्ष संपदा सिध्दये व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.