
बांदा : पाट परुळे येथील सचिन सदानंद परब (वय ३७) या युवकाने निगुडे येथे काजूच्या बागेत हाताची नस कापून घेत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी युवकाला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती नाजूक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. बांदा पोलीस घटनास्थळी दखल झाले असून नोंद करण्याचे काम सुरु आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
सचिन परब हा युवक आज सायंकाळी काजूच्या बागेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्थानिक युवकांनी त्याला तातडीने बागेतून मुख्य रस्त्यावर आणत बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सारंग यांनी प्राथमिक उपचार केलेत. रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्याची प्रकृती नाजूक बनली. त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बांदा पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.