उद्या बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा

Edited by:
Published on: May 16, 2025 11:38 AM
views 23  views

सिंधुदुर्गनगरी :  अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक १७ मे २०२५ रोजी "बाळशास्त्रीं जांभेकर अभिवादन सभेचे" आयोजन करण्यात आले आहे.. एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमास सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.. कार्यक़मास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे.. १७ मे रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची १७९ वी पुण्यतिथी आहे.. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी अभिवादन सभा होत असते यावर्षी अ. भा. मराठी पत्रकार परिषद देखील या कार्यक्रमात सहभागी होत असून राज्यभरातून परिषदेचे शंभरावर पदाधिकारी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी सिंधुदुर्ग नगरीत येत आहेत.. सिंधुदुर्ग ही बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी आहे.. पोंभुर्ले येथे बाळशास्त्रींचा जन्म झाला.. ओरस येथे बाळशास्त्री जांभेकर यांचे नुकतेच भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.. या स्मारकातच अभिवादन सभा सकाळी 10 वाजता होणार आहे..जिल्हा आणि राज्यातील पत्रकारांनी या कार्यक़मास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आलं आहे..

अभिवादन सभेनंतर दुपारी 1.30 वाजता अ. भा. मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक बैठक सभागृहातच होत आहे.. पत्रकारांसमोरील विविध समस्यांची चर्चा करून ठोस निर्णय बैठकीत घेतले जाणार आहेत.. परिषदेचे वरिष्ठ अधिकारी उपाध्यक्ष, विभागीय सचिव, परिषद प्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य, अधिस्विकृती समितीवरील परिषदेचे प्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष तसेच डिजिटल मिडिया परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि महिला आघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी बैठकीस निमंत्रित आहेत.. दर तीन महिन्यांनी परिषदेची ही बैठक राज्याच्या विविध भागात होते.. मागील बैठक नांदेड येथे पार पडली होती...यावेळची बैठक सिंधुदुर्ग येथे होत असून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने बैठकीची सर्व व्यवस्था आणि नियोजन केले आहे.