
कणकवली : कणकवली बाजारपेठ येथील रहिवासी तथा वृत्तपत्र विक्रेते बाळकृष्ण उर्फ बाळा अनंत वाळके ( ८२)यांचे बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
बाळकृष्ण वाळके हे कणकवली बसस्थानकात वृत्तपत्र विक्री तसेच फळ विक्रीचा व्यवसाय करत असत. यंगस्टार क्रीडा मंडळाचे रंजन वाळके,नंदू वाळके,परेश वाळके,रुपेश वाळके यांचे ते वडील होत.