
सावंतवाडी : निरवडे येथील विद्यमान सदस्य दशरथ मल्हार यांच्यासह अनेकांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला असून तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी भाजप-शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने निरवडे येथील मेळाव्यात पक्षप्रवेश झाला. सुमारे ६५० पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,तालुका प्रमुख रूपेश राऊळ, बाळा गावडे, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, सतिश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, चंद्रकांत कासार,राजू नाईक व अन्य उपस्थित होते.