वैभववाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैभववाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. हा दिवस सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वैभववाडी ठाकरे शिवसेनेच्यावतीने पक्षाच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर, युवासेना तालुकाप्रमुख रोहित पावसकर, महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील, माजी जि.प.सदस्या दिव्या पाचकूडे,नगरसेवक मनोज सावंत, लोरे विभाग प्रमुख सूर्यकांत परब, महिला शहर प्रमुख मानसी सावंत, राजेश तावडे, उपविभाग प्रमुख स्वप्निल रावराणे, युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार, कोळपे सरपंच सुनील कांबळे, सोनाळी शाखाप्रमुख अनिल कदम, कोकिसरे शाखाप्रमुख अनंत नांदलस्कर, दीपक पवार राजाराम गडकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.