देवगडमध्ये बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

Edited by:
Published on: January 24, 2025 14:01 PM
views 131  views

देवगड : देवगड इथं हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ठाकरे शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.  देवगड तालुका मध्यवर्ती कार्यालयात हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, ग्रामीण रुग्णालय देवगड येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.

तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती देवगड आगारातील उबाठा शिवसेना कामगार सेनेच्या वतीने देखील यावेळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.तसेच देवगड ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना बिस्कीट पुडा,पाणी बाटलीचे वाटप करण्यात आले.यावेळी आगार व्यवस्थापक विजय घोलप,कामगार सेना आगार अध्यक्ष सिकंदर बटवाले,संतोष शिंदे,ब्रम्हदेव चव्हाण,अमोल पाटकर,तालुकाप्रमुख मिलिंद साटम,जयेश नर,महिला आघाडी तालुका संघटक हर्षा ठाकूर,युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे ,नगरसेवक तेजस माम घाडी ,उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल माजी उपसभापती संजय देवरुखकर, ज्येष्ठ शिवसैनिक दिनेश पारकर, उदय करंगुटकर, गणपत जाधव, योगेश गोळम, विश्वनाथ परब , महेंद्र उर्फ पिला भुजबळ, चंद्रकांत रुपये शांताराम घाडी,विजय कुळकर आदी शिवसेना पदाधिकारी  उपस्थित होते.