बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल इथं मराठी दिन उत्साहात..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 28, 2024 06:58 AM
views 151  views

कणकवली : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल येथे सकाळी दहा वाजता जागतिक मराठी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर(उर्फ कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवशी जागतिक मराठी दिन साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.

सुरुवातीला ज्ञानेश्वरी ग्रंथाची ग्रंथ दिंडी पालखी सोहळ्यातून काढण्यात आली. त्यानंतर ही मायभूमी ही जन्मभूमी या गीताने विद्यार्थ्यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाठी प्रमुख अतिथी कथक विशारद निलांबरी दामले, शाळेच्या संचालिका सुलेखा राणे, संस्थेचे डायरेक्टर संदीप सावंत, संस्थेचे सदस्य मान.झगडे सर ,मान.सापळे सर मुख्याध्यापिका सौ. गीतांजली कुलकर्णी मॅडम,संस्कृतचे शिक्षक अरुण वळंजू सर, शिक्षक पालक संघाचे सहसचिव अरुण राणे उपस्थित होते.

या दिवसाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते नववी विद्यार्थ्यांनी मराठी भाषा विषयावर विविध कार्यक्रम सादर केले.इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे उगम व महत्त्व, तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील रस्व व दिर्घ शब्दांच्या फरकाने होणारा मराठी शब्दांचा अर्थ, पाचवीच्या विद्यार्थ्यानी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ (कुसुमाग्रज) यांनी लिहिलेल्या विविध कवितांचे वाचन, सहावी च्या विद्यार्थ्यांनी बोधकथा, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीं कविता वाचन व कथा वाचन केले, आठवीच्या विद्यार्थ्यांनी बोधकथा सांगीतल्या तर तिसरी ची विद्यार्थिनी उन्नती गोडे व नववी ची विद्यार्थीनीं सान्वी वाघाटे या विद्यार्थ्यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गीत सादर केले.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक अश्विनी जाधव, शिल्पा तिवरेकर, नेहा मसुरकर,संपदा नर, प्रेरणा चिंदरकर , श्यामली कदम,जिश्र्ना नायर, आनंद मेस्त्री, श्रीपाद बाणे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा कदम यांनी तर आभार नेहा जामसंडेकर यांनी मानले.