
सावंतवाडी : मुलांनी चांगला आहार केला तर त्यांना चांगल आरोग्य लाभू शकतं. बाल रक्षा भारत यांनी केलल काम उल्लेखनीय आहे. ही मुलं भारताच भविष्य आहे, ही मूल चांगली घडली तर देश चांगला घडेल असे उद्गार माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी काढले. बाल रक्षा भारत संस्था संचलित 'इट राईट स्कूल' प्रकल्प अंतर्गत प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
आम. केसरकर म्हणाले, या मुलांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. आपल्या जिल्ह्याच नाव उज्वल करण्यात या शिक्षकांचा वाटा मोठा असून त्यांचा मला अभिमान आहे. शालेय शिक्षणमंत्री असताना सकस मुलांच्या आहारासाठीच्या प्रस्ताव आला होता. बहुतांश शाळांत हा उपक्रम सुरू असून चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात असे उद्गार काढले.
श्री. केसरकर यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळांना या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. बाल रक्षा भारत, इम्पलिमेटींग सेन्सा, मॉंडेलीज इंडिया, फुड स्टँण्डर अँड सेफ्टी एथोरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सकस व संतुलित आहाराबाबत मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. यावेळी मुलांनी सकस आहाराबाबत जागृती करणारी गीते सादर केली. यावेळी प्रोजेक्ट मॅनेजर मिर्झा बेग, प्रोग्राम हेड प्रदीप मिश्रा, सहाय्यक प्रोजेक्ट मॅनेजर अपर्णा जोशी, प्रभारी प्राचार्य प्रा. महेंद्र ठाकुर, रणजीत सावंत आदींसह शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.










