बलात्कार प्रकरणी आरोपीला जामीन मंजुर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 07, 2023 14:57 PM
views 230  views

सिंधुदुर्ग : सुकळवाड येथील आरोपी प्रदीप मारुती पाताडे याची जिल्हा व सत्र न्यायधिश  यांनी रक्कम रुपये पंधरा हजारच्या जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश पारित केलेला आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध ३७६,३७६(२)(N),३५४,३५४(D),५०६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी याला २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक करण्यात आलेली होती. याकामी ॲड. अनिल निरवडेकर यांनी आरोपी याला जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालय ओरोस येथे जामीन अर्ज दाखल केलेले होता. त्याकामी जिल्हा न्यायालयाने ॲड. निरवडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस जामीन मंजुर केला आहे.याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर,ॲड. गणेश चव्हाण,ॲड. अशोक जाधव, चैतन्य सावंत,ॲड. सत्यवान चेंडवणकर यांनी काम पाहिले.