कोकणसाद LIVE च्या 'बदलतं कोकण' प्रतिकृती स्पर्धेत 29 फेब्रुवारीपर्यंत सहभाग घेता येणार !

Edited by: जुईली पांगम
Published on: February 20, 2024 11:15 AM
views 376  views

सिंधुदुर्ग : पृथ्वीवरचा स्वर्ग अशी आपल्या कोकणची ओळख.  कोकणच्या परंपरा, संस्कृती, दशावतार कला, खाद्यसंस्कृती, अथांग पसरलेला समुद्र, शेती बागायती, निसर्ग सौंदर्य, गोड रसाळ मालवणी भाषा आणि साधा भोळा कोकणी माणूस याच्या चर्चा तर नेहमीच होतात. आता आपलं हेच कोकण झपाट्याने बदलतंय. जुन्याची सांगड घालून नवे बदल होतायत. याचे चांगले वाईट परिणाम रोज आपला कोकणवासीय अनुभवतोय. हेच विश्व आपल्याला उलघडवायचंय प्रतिकृतीच्या माध्यमातून. यासाठी कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE घेऊन आलंय खास 'बदलतं कोकण' प्रतिकृती स्पर्धा. 10 व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत खास या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेतील वाढत्या प्रतिसादामुळे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. सहभागासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदवू शकता. 

कशी असेल स्पर्धा ?

  • 'बदलतं कोकण' याचं प्रतिबिंब दाखवणारी प्रतिकृती असावी 
  • स्पर्धा खुली आहे 
  • वयाची कोणतीही अट नाही 
  • पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या प्रतिकृतीला प्राधान्य 
  • प्रतिकृतीची प्रभावी माहिती देणाऱ्यासाठी गुण राखून ठेवण्यात आले आहेत
  •  प्रतिकृती आणताना नाव, पत्ता, वय, मोबाईल नंबर याचा उल्लेख असावा.
  • नाव नोंदणीसाठी 7720096037 या क्रमांकावर संपर्क साधा 
  • नाव नोंदणीसाठी 29 फेब्रुवारी शेवटची तारीख 


आकर्षक बक्षीसं !

या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीसंही मिळणार आहेत. प्रथम क्रमांक विजेत्यास 7, 777रु. आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक विजेत्यास रु. 5,555 आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक विजेत्यास 3,333  रु. आणि सन्मानचिन्ह अशी बक्षीस असणार आहेत. 

या प्रतिकृतींचं प्रदर्शन भोसले नॉलेज सिटी इथं होणाऱ्या आमच्या वर्धापन दिन सोहळ्यात भरवण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांनाही या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अधिक वेळ न दवडता प्रतिकृती बनवण्याच्या तयारीला लागा, स्पर्धेत सहभागी व्हा, असं आवाहन टीम कोकणसाद LIVE च्यावतीने करण्यात आलंय. 

क्रिएटीव्हीटीला वाव द्या...'प्रतिकृती स्पर्धे'त सहभागी व्हा...

टीप : सर्व अधिकार आणि अंतिम निर्णय कोकणसाद LIVE कडे राहील