मंगलमय होळीत वाईट विचारांचं दहन होईल : मंत्री दीपक केसरकर

शिक्षणमंत्री केसरकर यांनी सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी होळीचे घेतले दर्शन
Edited by: विनायक गांवस
Published on: March 07, 2023 17:36 PM
views 123  views

सावंतवाडी : होळी पोर्णिमेच्या निमित्ताने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरातील ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या होळीचे दर्शन घेतले. यावेळी वाईट विचारांच दहन होऊन चांगले विचार येवो, जनतेच्या आयुष्यातील दुःख, यातना जळून जाऊन सुख, समाधान अन् शांती त्यांच्या जीवनात येवो, असं मत त्यांनी व्यक्त केल.

चितार आळी, होळीचा खुंट, सबनीसवाडा, खासकीलवाडा, सालईवाडा, माठेवाडा आदी भागतील उभारण्यात आलेल्या होळीचे दर्शन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतले. यावेळी होलीकेच दहन करण्यात आल. मंत्री केसरकर यांनी होळीत नारळ अर्पण केला.

यावेळी शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात साजरा केला जातो. वाईट विचारांच दहन या निमित्ताने केलं जातं. चांगले विचार घेऊन यानंतर कार्य केलं जातं. प्रत्येकाला आपल्या सणांचा अभिमान असतो तसा मलाही कोकणातील सणांचा आहे. आज या निमित्ताने जनतेत सहभागी होता आलं. जनतेच्या आयुष्यातील दुःख, यातना या जळून जाऊन सुख, समाधान अन् शांती त्यांच्या जीवनात येवो अशी प्रार्थना केल्याच मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.


दरम्यान, होळीचा खुंट येथे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर व जुना बाजार मित्रमंडळाच्यावतीन मंत्री केसरकर यांच स्वागत करण्यात आले.‌ यावेळी या ठिकाणच्या विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल सुधीर आडीवरेकर यांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले.


याप्रसंगी माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, देव्या सुर्याजी, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर, परशुराम चलवाडी, अर्चित पोकळे, गौतम माठेकर आदी उपस्थित होते.