देवगड जामसंंडेत मच्छी विक्रीमुळे दुर्गंधी !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 15, 2023 19:24 PM
views 114  views

देवगड : देवगड जामसंडे शहरामध्ये मासळी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये शिस्त उरली नाही आहे. सध्या पर्यटनाचे हे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य बनत चालले आहे. जामसंडे पेट्रोल पंप्पा  पासून देवगड एस् टी स्टॅन्ड पर्यंत सुमारे 16 ते 17 ठिकाणी या मच्छीमार महिला बसत असल्याने नगरपंचायत मात्र बघ्याची भूमिका घेत आहे.


देवगड-जामसंडे मध्ये दोन मच्छी मार्केट असून जामसंडे गावाचे स्वतंत्र देवगड मध्ये स्वतंत्र मच्छी मार्केट आहे . मात्र या मच्छी मार्केटमध्ये पुरेशा सुविधा देवगड जामसंडे नगरपंचायतीने देत नसल्याचे कारण पुढे करत,मच्छी विक्रेते देवगड शहरभर मासळी विक्री करताना दिसत आहेत. त्याला कोणताही धरबंद राहिला नाही. विक्रेते जरी रस्त्याच्या कडेला बसत असले तरी रस्त्यावर गाडी लावून मासळी नागरिक घेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी दिसून येते आहे. विशेषता स्टँडकडून खाली जाणारे रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध गाड्या लावून मासळी खरेदी केली जाते. यावर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र नगरपंचायत याकडे सोयीस्कर लक्ष देण्याच्या मनस्थितीत दिसत  नाही आहे.

नगरपंचायतीचा भटक्या कुत्र्याचा ,स्वच्छतेचा प्रश्न फार मोठा आहे. सध्या देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीत व्यवस्थापन नसल्यासारखेच आहे. यावर तीव्र नाराजीचे वातावरण असल्याचे दिसत आहे.