नगरपालिका शौचालयाची बिकट अवस्था

Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2024 12:55 PM
views 84  views

सावंतवाडी : शहरात असलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी जवळील नगरपालिका शौचालयावर गवत वाढल्याने त्या ठिकाणी साप, विंचू यांसारखे प्राणी असण्याची शक्यता आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शौचालयाची बिकट अवस्था झाली आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एकेकाळी ज्या नगरपरिषदेने कोकण व महाराष्ट्रामध्ये रँकिंग प्राप्त केल ती आज काही अधिकाऱ्यांमुळे अनेक समस्यांच्या फेऱ्यांमध्ये अडकली आहे. याबाबत उद्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन या सर्व समस्यांबाबत त्यांचे लक्ष वेधणार असून जाब विचारणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. तर नागरिकांना परिसरातील समस्या असतील तर  त्यांनी उद्या साडेअकरा वाजता नगरपरिषदेमध्ये उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.