LIVE UPDATES

दाणोलीतील बाबुराव पाटयेकर विद्यालयाचा निकाल १०० टक्के

Edited by:
Published on: May 13, 2025 18:13 PM
views 104  views

सावंतवाडी : दाणोली येथील कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या प्रशालेतून परीक्षेला बसलेले सर्व ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन विशेष श्रेणीत २० तर प्रथम श्रेणीत ९ तर द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

या शाळेतून प्रथम क्रमांक कु प्राजक्ता काशीराम जंगले (५०० पैकी ४७८ गुण) ९५.६०%, द्वितीय क्रमांक कुमारी गौतमी रवींद्र मोर्ये (५०० पैकी ४७३ गुण) ९४.६०%, तर तृतीय क्रमांक कु गायत्री रवींद्र मोर्ये (५०० पैकी ४५७ गुण) ९१.४०%, या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शरद नाईक पाटयेकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक जयवंत पाटील आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.