
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचे ज्येष्ठ नेते व गरिबांचे खरे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बाबुराव धुरी हे रंजल्या–गांजल्या लोकांसाठी सतत झटणारे नेतृत्व आहे. अशा सच्चा सामाजिक कार्यकर्त्यावर काही व्यक्तींकडून केली जाणारी चिखलफेक हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे शिवसैनिक संदेश वरक यांनी ठणकावले आहे.
वरक म्हणाले, “बाबुराव धुरी यांनी आपल्या आयुष्यातील अधिक काळ गरीब, वंचित व गरजू लोकांसाठी झटून घालवला आहे. त्यांच्या कार्याला जनतेचा पाठिंबा आहे. जे लोक त्यांच्यावर चिखलफेक करत आहेत, त्यांनी आधी स्वतःची कर्तबगारी तपासून पाहावी आणि मगच बोलावे.” या नेतृत्वावर “दोडामार्गच्या जनतेचा या नेतृत्वावर दृढ विश्वास आहे. अशा अफवांना बळी न पडता आपण सर्वांनी बाबुराव धुरी यांच्या विकासकामांना आणि समाजसेवेला पाठिंबा द्यावा.”










