माजी नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या मागणीला यश !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 28, 2023 21:52 PM
views 217  views

सावंतवाडी : आठवडा बाजार स्थलांतरित केलेल्या गोदामाच्या चहुबाजूंनी आठवड्यात व पावसापूर्वी डांबरीकरण करून देण्यात याव अशी मागणी माजी नगरसेवक बाबु कुडतरकर यांनी होती. जेणेकरून हा बाजार विक्रेते व ग्राहकांना सोयीस्कर ठरेल. पावसाला अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले असताना त्या आधी हे डांबरीकरण करावं अशी मागणी खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी केली होती. 


दरम्यान, या आठवडा बाजारासाठी पायाभूत सुविधांसाठी न.प. प्रशासनाकडुन युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले आहे. पावसाळ्यात निर्माण होणारी गैरसोय लक्षात घेऊन तब्बल ५० लाख रूपयांची तजवीज आमदारांनी केली आहे. या परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आल्यानंतर आता डांबरीकरण आणि नाल्याची दुरूस्ती केली जात आहे. ५० लाख रुपयांचा निधी आमदार फंडातून मंजूर केला आहे. खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हातात घेण्यात आले आहे. आता नाल्यात पाईप घालून पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. तसेच लाईटची व्यवस्था करण्यात आली असून फिरते शौचालय उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तसेच परिसरात असलेली झाडे लवकरच तोडण्यात येणार आहे असे न.प. प्रशासनाकडून सांगण्यात आले.