भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा : बबन साळगावकर

लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने केला होता हल्ला
Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 08:25 AM
views 129  views

सावंतवाडी : बाहेरचावाडा येथे एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला करून चावा घेत तीला जखमी केले. या कुत्र्यांचा बंदोबस्त सावंतवाडी नगरपरिषदेने त्वरित करावा असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी दिला आहे.


शहरात सध्या बेवारस कुत्रे हैदोस घालत आहेत. त्याचा फटका गरीब नागरिकांना बसत आहे. काही शौकीन नागरीक कुत्री पाळतात. या पाळीव कुत्र्यांना सकाळ-संध्याकाळ फिरताना हे कुत्रे रस्त्याच्या मध्यभागी विष्टा करतात. याबाबत या कुत्रा प्रेमी नागरिकांना सांगणेही मुश्किल झालेल आहे. अशा कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर विष्टा करण्यास मनाई आहे. तसा कायदा आहे. परंतु, सावंतवाडी नगरपरिषद जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप साळगावकर यांनी केला आहे. सकाळी कुत्र्यांना रस्त्यात विष्टा करायला लावणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांवर कारवाई व्हायला हवी. याबाबत आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरने वैभव नाटेकर यांना आम्ही बरेच वेळा कल्पना दिली आहे. मोकाट कुत्रे आणि रस्त्यावरील कुत्र्यांना विष्टा करायला लावणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांवर नगरपरिषदेला कारवाई करायला जमत नसेल तर नगरपरिषदेच्या विरोधात कडक भूमिका आम्हाला घ्यावी लागेल असा इशारा साळगावकर यांनी दिला आहे.