१६ कोटी सोडा, १६ रु.चं पण काम नाही

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : बबन साळगावकर
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 23, 2023 11:40 AM
views 368  views

सावंतवाडी : १६ कोटी ६५ लाख रुपये आंबोली घाट रस्त्यावरती गेल्या चार वर्षांमध्ये खर्च केले असुन प्रत्यक्षात मात्र १६ रुपयांचे काम झाले नसल्याची टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. तसंच  या कामात मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असून याबाबत आम्ही सजक सिंधुदुर्ग यांच्यावतीने सावंतवाडी पोलिस ठाण्यात  तसेच पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे लेखी अर्ज दाखल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असल्याचं साळगावकर यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने याची गंभीर नोंद घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलीय.