कणकवली नगरपंचायतचा आयुष्यमान भारत योजनेचा विशेष कॅम्प..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 15, 2023 12:15 PM
views 599  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनाचा विशेष कॅम्प आयोजित केला आहे. पुढील 8 दिवस हा कॅम्प  वेगवेगळ्या तारखेस सकाळी 10.30  ते सायं. 5.00 असणार आहे. यामध्ये सोमवार दि. 16/10/23 - सिद्धार्थनगर समाज मंदिर,मंगळवार दि. 17/10/23- कणकवली नगर पंचायत कार्यालय, बुधवार दि. 18/10/23- जि.प. शाळा न. 1 आचरा रोड, 

गुरुवार दि. 19/10/23-

जि.प. शाळा न. 5  शिवाजीनगर,

शुक्रवार दि. 20/10/23-

जि.प.शाळा न. 3 भालचंद्र महाराज मठ,  आणि बुधवार दि. 25/10/23 ते शुक्रवार 27/10/23 या कालावधीत

कणकवली नगरपंचायत कार्यालय येथे हा कॅम्प होणार आहे.तरी  पिवळे, अंत्योदय कार्ड धारक, केशरी रेशनकार्ड धारक यांनी वरील ठिकाणी रेशन कार्ड /आधार कार्ड व मोबाईल घेऊन उपस्थित राहून आपले कार्ड काढून घ्यावे असे आवाहन कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या वतीने आले आहे.