सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांसाठी अयोध्या दर्शन

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 02, 2024 13:05 PM
views 262  views

कणकवली : ८ फेब्रुवारीला रात्री १० वाजता पनवेल रेल्वे स्थानक येथून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि रामभक्त यांना दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी २५० प्रमाणे १५०० लोकांना घेवून अयोध्या राम मंदिरात महाआरती करण्यात येणार आहेत.

आम्ही अयोध्या श्रीराम मंदिरात गुलाल उधळीत वाजत – गाजत जाणार आहोत.त्या ट्रेनचा प्रमुख मी आणि स्थानिक नेते असणार आहेत.विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली ,कणकवली आ.नितेश राणे,कुडाळ निलेश राणे , रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे जबाबदारी आहे.या गाडीला हिरवा झेंडा पालकमंत्री रविंद्र चव्हाण दाखवणार असल्याचे श्री.जठार यांनी सांगितले.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर,बबलू सावंत उपस्थित होते.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी,कोल्हापूर या भागातील काजू बी 200 रुपये हमी भाव द्यावा, या बाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी झालो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याच त्यांनी सांगितलं.