अयोध्येत राम लल्लाच्या दर्शनासाठी भाजपच्यावतीने आस्था ट्रेनची सुविधा

सावंतवाडीतून शेकडो राम भक्त रवाना
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 11:12 AM
views 481  views

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील  राम भक्तांसाठी अयोध्या येथील रामलल्ला दर्शनासाठी खास आस्था ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली.

सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातून माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून शेकडो राम भक्त आयोध्येसाठी रवाना झाले. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक व आरोग्य सभापती आनंद नेवगी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, शहर सरचिटणीस विनोद सावंत, युवा नेते बंटी पुरोहित, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर आदी रामभक्त उपस्थित होते.