कोलगाव सातेरी मंदिरात सहोम नवचंडी याग अनुष्ठान !

अयोध्येतील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचं औचित्य
Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 07:12 AM
views 110  views

सावंतवाडी : अयोध्येत श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या औचित्यवर कोलगाव येथील श्री सातेरी मंदिरात सोमवार २२ ते बुधवार २४ जानेवारी दरम्यान सहोम नवचंडी याग अनुष्ठानचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने रविवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुळ घराकडून देवतांचे तरंगकाठीसह वाजत गाजत श्रीदेवी सातेरी मंदिर येथे प्रस्थान व मुक्काम होणार आहे. सोमवार २२ जानेवारी रोजी सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान शांतीपाठ, श्रीरामरक्षास्तोत्र पठाण, यजमान देहशुद्धी, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आदिंसह विविध धार्मिक कार्यक्रम होतील. तसेच देवी पूजा, आरती, महानैवैद्य, तीर्थप्रसाद, ब्राह्मण भोज,न सुहासिनीसाठी देवीचरणी कुंकुमार्चन व महाप्रसाद होईल.

     मंगळवार २३ रोजी सकाळी ७ वाजल्या पासून विविध धार्मिक कार्यक्रम, ९.३० वाजता सुहासिनीसाठी कुंकुमार्चन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ दरम्यान सुहासिनीसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, ८ वाजता श्री मोरेश्वर दशावतार कंपनीचा नाट्यप्रयोग होईल. बुधवार २४ जानेवारी सकाळी १० वाजता अभिषेक, दुपारी महाप्रसाद, ३ वाजता देवतांचे तरंगकाठी सह कुळघरी प्रस्थान झाल्यावर कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी पंचायतन देवस्थान मानकरी, ग्रामस्थांनी केले आहे.