मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जागरूकता कार्यक्रम

शिवसेनेचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 28, 2025 19:14 PM
views 92  views

सावंतवाडी  : इन्फोसिस फाउंडेशनच्या आणि आकार सोशल वेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन २९ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता पत्रकार भवन, ओरोस, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जागरूकता निर्माण हा असल्याची माहिती आकार सोशल व्हेंचरचे चेअरमन मनीष गुप्ता यांनी दिली. आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीता सावंत, शहर प्रमुख भारती मोरे, आकार सोशल व्हेंचरचे संचालक जयदीप पंडल, प्रोग्रामर हेड स्वाती पाटील तसेच माजी नगरसेविका दिपाली सावंत, शर्वरी धारगावकर आदी उपस्थित होते. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सावंत म्हणाल्या, उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाला, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमध्ये मासिक पाळीमध्ये महिलांनी स्वतःची घ्यावयाची काळजी, स्वच्छता व त्या दृष्टीने शासनाने आखलेल्या धोरणानुसार मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त किशोरवयीन मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे.

आकार सोशल व्हेंचर चे चेअरमन श्री गुप्ता म्हणाले, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र शासन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील ११५४ जिल्हा शाळांमधील सुमारे ९,२६,००० मुलींसोबत हा गर्ल्स वेलनेस प्रोग्राम राबविण्यात आला असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९८८ शाळांमधील सुमारे ४,००० मुलींचा समावेश आहे.

'आकार ही एक सामाजिक संस्था असून ती आकार इनोव्हेशन्स प्रा. लि. व आकार सोशल वेंचर्स' या दोन घटकांद्वारे कार्यरत आहे. मागील १५ वर्षांपासून आकारने मासिक पाळी स्वच्छता आणि आरोग्यविषयक जागरूकतेच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. 'आम्ही आनंदी' या नावाने शंभर टक्के कंपोस्टेबल (बायोडिग्रेडेबलपेक्षा अधिक पर्यावरणपूरक), भारत सरकार प्रमाणित, उच्च गुणवत्तेचे सॅनिटरी नॅपकिन्स तयार व वितरित करतात. या कार्यक्रमात शासनाचे विविध मान्यवर अधिकारी, तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी सहभागी होणार आहेत. मासिक पाळी स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी सत्र, व्हिडिओ, फोटो, लाभांच्या यशोगाथा आणि Menstrual Hygiene Lab अंतर्गत खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त किशोरवयीन मुली महिला तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी शिक्षक वर्गाने उपस्थित रहावे.