श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत 'जागरूकता कार्यक्रम'

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 26, 2025 13:28 PM
views 105  views

देवगड :  पोषण पखवाडा (पंधरवडा) निमित्त जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत “जागरूकता कार्यक्रम" पोषण साक्षरता मोहीम, Toyathon कार्यशाळा,निबंध लेखन स्पर्धा, पालकांचा सहभाग, पारंपारिक आणि स्थानिक अन्नाला प्रोत्साहन व आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता असे उपक्रम राबवण्यात आलेत.

पोषण अभियान (राष्ट्रीय पोषण अभियान) उपक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारने दि.८ एप्रिल २०२५ ते २५ एप्रिल २०२५ हा कालावधी पोषण पखवाडा (पंधरवडा)म्हणून घोषित केला असून पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती, निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहाराची सवय आणि मिशन पोषण २.० अंतर्गत धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळाशाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत.

 मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण पखवाडा अभियान यशस्वी होण्यासाठी मंगेश रा.गिरकर, संजीवनी बा.जाधव, विनायक न.जाधव, समीरा सं.राऊत , मोहन क. सनगाळे यांनी प्रयत्न केले.