
फोंडाघाट : ओरस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे, नुकतीच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते सरपंच सौ.संजना आग्रे,ग्रा.पं.सदस्य मिथिल पटेल आणि ग्रामसेवक मिलिंद राणे यांनी २०२४/२५ या वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल फोंडाघाट ग्रामपंचायतिला केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये द्वितीय आणि राज्य पुरस्कृत योजनेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते ...
ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवर्ग आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाला. यापुढे असे सहकार्य लाभले तर आपली ग्रामपंचायत सर्वार्थाने पुढे जाईल.असे सरपंच सौ. संजना आग्रे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना सांगितले. पुरस्कार प्राप्ती बद्दल गावात ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे..