दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 19:21 PM
views 157  views

सावंतवाडी : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंतवाडी शहरातील आरपीडी हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल, मदर क्वीन इंग्लिश सेंट्रल इंग्लिश स्कूल, सेंट्रल उर्दू व वि .स खांडेकर हायस्कूल मधील पहिला दुसरा व तिसरा क्रमांकाने पास झालेल्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्त्री रोग तज्ञ सेवानिवृत्त डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम 1 जुलै रोजी अकरा वाजता राजा शिवाजी चौक येथील वैश्य भवन मध्ये ठीक 10:30 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष वैभव (बंटी) माटेकर यांनी केले आहे. 


या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मंडळाचे अध्यक्ष वैभव (बंटी) माठेकर सचिव दीपक सावंत सहसचिव महादेव राऊळ, उपाध्यक्ष रवींद्र तोरसकर, विजय पवार, अरुण घाडी यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी नगरसेवक विलास जाधव उपस्थित होते. तसेच मंडळाचे कार्यकर्ते उमेश खटावकर, प्रदीप नाईक, सुनील गावडे, राजेंद्र सांगेलकर ,उदय भराडी, रॉक्सन डान्टस, शुभम मालळकाचे उपस्थित होते. या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात तसेच आरोग्य क्षेत्रामध्ये (सावंतवाडी उपरुग्णालय) देखील  या मंडळाचे मोठे योगदान असते. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची  शोभा वाढवावी असे नम्र आवाहन  मंडळाचे माहिती अधिकारी रवी जाधव यांनी केले आहे.