आदर्श शिक्षक पुरस्कार प्रफुल्ल ठोकरेंना जाहीर

खा. छत्रपती उदयनराजेंच्या वाढदिवसाच औचित्य
Edited by: विनायक गांवस
Published on: February 10, 2023 18:15 PM
views 183  views

सावंतवाडी : श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचा वाढदिवसाचे(24फेब्रुवारी) औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आसोली शाळा नंबर एक .2022 -2023 साठी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी उपशिक्षक प्रफुल्ल रमेशराव ठोकरे यांचा नावाची घोषणा करण्यात आली आहे.

श्रीमंत छत्रपती खासदार श्री उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या वाढदिवसाचे(२४फेब्रुवारी) औचित्य साधून शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श कामगिरी केलेल्या शिक्षकांना राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत 2022-2023साठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर व सल्लागार नारायण सावंत व तज्ञ समितीने प्रफुल्ल ठोकरे या नावाची शिफारस केली असून राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग यांचे मार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार  प्रदान करण्यात येणार आहे.