
सावंतवाडी : सकल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मराठा समाज आणि आर्थिक दृष्ट्या मागास (ईडब्लूएस) दाखले देण्यासाठी टाळाटाळ होतेय असं सांगत तहसीलदार श्रीधर पाटील यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात निषेधाच्या घोषणाही दिल्या. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी केली.
यावेळी मराठा समाजाच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या मागास ( ई डब्लू एस) दाखले मिळू नये म्हणून तहसीलदार श्रीधर पाटील कार्यरत असल्याच्या तक्रारीही काही पालकांनी केल्या.यावेळी अध्यक्ष सीताराम गावडे यांनी आपल्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करु असा इशारा दिला.मराठा समाजाच्या लोकांना आर्थिक दृष्ट्या मागास नमुना अर्ज मिळणार नाहीत अशी खबरदारी तहसीलदार यांनी घेतली असल्याचे समोर आले.सकल मराठा समाज अध्यक्ष सीताराम गावडे,माजी नगरसेवक विलास जाधव खेमराज कुडतरकर, माजी सभापती प्रमोद सावंत,प्रमोद गावडे,तारकेश सावंत,राघोजी सावंत,उमा वारंग, सतिश बागवे,लवू लटम,सचीन सावंत,अजय सावंत,अमीत परब,बंटी माठेकर, महादेव सावंत, राजेश नाईक,राजू तावडे,युक्ता सावंत,दिया सावंत,श्रीराम पवार,काका मांजरेकर, सचिन कृष्णा सावंत, संदिप सावंत,मनोज घाटकर,संजय लाड,सरपंच विजय गावडे, संतोष परब समीर शिंदे,आंकूश गावडे, नारायण राणे,शिवदत्त घोगळे,विनायक गुरव, गुणाजी गावडे,अब्जू सावंत,महादेव राऊळ, नंदकुमार गावडे,कैलास परब,गंगाराम घाटकर,विजय पवार,रोहन चव्हाण, प्रशांत मोरजकर सुभाष गावडे, सुधीर राऊळ,राकेश परब,विजय बांदेकर, गंगाराम राऊळ,सुहास कदम,ऋषी सावंत,कोमल,गावडे ,प्रियांका निर्गुण आदि उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, एक व्यक्ती एक आरक्षण द्यावे असा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठा समाज दाखला आणि ई डब्लू एस दाखला देता येणार नाही. तसेच दाखला देताना वंशावळ महत्त्वाची आहे. सध्या कुठेही दाखले दिले जात नाहीत. आम्ही दाखले तयार करून प्रांताधिकारी कार्यालयात पाठवितो असे सांगितले.यावेळी सिताराम गावडे म्हणाले, शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी तहसीलदार म्हणून तुम्ही केली पाहिजे ती करत नाहीत. मराठा समाज आणि आर्थिक दृष्ट्या मागास हे दाखले दिले जातात ते सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातून देण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार तहसीलदार म्हणून तुम्ही जबाबदार आहात. शासन निर्णयानुसार दाखले दिले पाहिजे पण पालक आणि विद्यार्थी यांना त्रास दिला जात आहे. मराठा समाज पेटून उठला तर सळो की पळो करून सोडेल.तहसीलदार श्रीधर पाटील मराठा समाजाला चुकिच्या पध्दतीने वागणूक देत आहेत. त्यामुळे समाज धिक्कार करतो. मराठा आरक्षण आणि ई डब्लू एस दाखले देण्यासाठी टाळाटाळ करू नका. या दाखल्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा बघून घेईल. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे वागू नका असा सल्ला सिताराम गावडे यांनी दिला. यावेळी विलास जाधव, राघोजी सावंत, उमाकांत वारंग, प्रमोद सावंत, राजू तावडे, प्रमोद गावडे, तारकेश सावंत व उपस्थित सहकाऱ्यांनी दाखले देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी केली.