राजापूर : गेल्या तीन निवडणुकांमध्ये राजापूर - लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघात अविभक्त शिवसेनेचा भगवा फडकवणारे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केलेला होता. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असली तरी ती किती टक्के आहे याचा हिशोब लावला जात आहे. अपक्ष म्हणून बंडखोरी केलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यासोबत या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर नारकर व अन्य मंडळी तडफेने प्रचारात उतरल्याने राजापूर - लांजा- साखरपा विधानसभा मतदार संघात गेम चेंजर म्हणून अविनाश लाड यांची गणती केली जात आहे. त्याचवेळी महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत होताना यावेळच्या निवडणुकीत मात्र शिंदे शिवसेना विरूध्द उबाठा शिवसेना अशीच खरी लढत पहावयास मिळणार आहे.
महायुतीकडून शिंदेसेनेचे किरण सामंत हे पहिल्यांदा निवडणुक लढवत असले तरी उद्योगमंत्री उदय समंत यांच्या या अगोदरच्या निवडणुकामधील विजयाचे मॅनेजमेंट गुरू अशी त्यांची ओळख आहे. तर महाविकास आघाडीकडून उध्दव सेनेचे आ. राजन साळवी हे ठाकरे परिवाराचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक घरात असणारा भावनिक संबंध पाहता या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. मागच्या निवडणुकीत आ. राजन साळवी यांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांनी या निवडणुकीत आपण स्थानिक उमेदवार असल्याचा वारंवार उल्लेख केलेला आहे. गत निवडणुकीप्रमाणेच या
आ. राजन साळवी यांनी गेल्या पंधरा वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या काळात आमदार फंडातील निधी व्यतिरिक्त कोणताही विकास निधी आणला नसल्याची टिका त्यांच्यावर होत आहे. विकास कामांमध्ये गेली पंधरा वर्षे मागे असलेले आ. राजन साळवी, त्यातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोडलेली त्यांची साथ, महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी पाहता यावेळच्या निवडणुकीत निवडणुकीत देखिल कुणबी अटीतटीचा सामना रंगणार आहे.
समाजाच्या बळावर लाड यांची भिस्त आहे. ते महाविकास आघाडीत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात आहेत. मागच्या निवडणुकीत अविनाश लाड यांनी आ. राजन साळवी यांना चांगलीच टक्कर दिलेली आहे. त्यावेळचा काँग्रेसचा मतदार यावेळी त्यांच्यासोबत अपक्ष म्हणून कितपत राहतो हे देखील महत्वाचे ठरणार आहे.