वैभववाडी : वैभववाडी तालुका मनसेचे सचिव दिवंगत दिपक पार्टे कुटुंबीयांची मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी भेट घेतली. पार्टे कुटुंबीयांच सांत्वन केले.
कै.पार्टे यांचं काही दिवसांपूर्वी विहीरीत पडून निधन झाले होते. या कुटुंबाची सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या अविनाश जाधव यांनी भेट घेतली. त्या कुटुंबाच सांत्वन करीत त्यांना धीर दिला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष महेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष सचिन तावडे, संदीप शिगार्डे यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.