
वेंगुर्ले : तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे.
विनायक खवणकर, अवधूत रेगे या सरपंच पदाच्या उमेदवारांना 222 समान मत पडल्याने चिठ्ठी टाकून उमेदवार निवडण्यात आला. ओवी काळसेकर या मुली द्वारे चिठ्ठी काढून निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये रेगे यांना विजयी घोषित करण्यात आले