
कणकवली : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांचा वाढदिवस बुधवारी 'विजयभवन'मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून रावराणे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षाचे कार्यकर्ते, हितचिंतक यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
ठाकरे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष रामदास विखाळे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, माधवी दळवी, दिव्या साळगावकर, संजना कोलते, राजू राठोड, सचिन सावंत, राजू रावराणे, संदीप कदम, राजू शेट्ये, रंजन चिके, संजय पारकर, सचिन आचरेकर, विलास गुड्डेकर आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.