
विजयदुर्ग : ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किल्यावरील संपूर्ण गवत कापून परिसर स्वच्छ करण्यात आला.
श्री.रावराणे यांचा आज वाढदिवस आहे.यानिमित्ताने आज त्यांनी प्रथम सकाळी गावाच्या श्री.राईस देवीच दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांसमवेत विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविले. तत्पुर्वी येथील भवानी मंदिरात जाऊन श्री रावराणे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर स्वच्छ्ता मोहीमेचा शुभारंभ केला. दरवर्षी श्री रावराणे आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवितात. याहीवर्षी मशीनच्या सहाय्याने किल्याच्या परीसरात असलेलं गवत कापून सर्व परीसर स्वच्छ केला. यानंतर कार्यकर्त्यांनी श्री रावराणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी देवगड तालुका प्रमुख मिलींद साटम, हर्षा ठाकूर, लक्ष्मण रावराणे, राजू रावराणे यासह देवगड विजयदुर्ग येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.