भला मोठा हार घालून उद्धव ठाकरे यांचं अतुल रावराणे यांनी केलं स्वागत..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 04, 2024 14:40 PM
views 303  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी जंगी स्वागत केले. ठाकरे यांना भलामोठा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांचा आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसंवाद दौरा सुरू आहे.सकाळी बांदा येथून या दौऱ्याला प्रारंभ झाला.सावंतवाडी,कुडाळ, मालवण असा दौरा करीत श्री.ठाकरे सायंकाळी कणकवलीत पोहोचले.ठाकरे यांच्या दौऱ्यात रावराणेही सकाळपासून आहेत.कणकवलीत अतुल रावराणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आले.भलामोठा हार घालून ठाकरे यांचं त्यांनी स्वागत केले.या दौऱ्याच्या निमित्ताने श्री रावराणे यांनी जिल्हाभर स्वागताचे बॅनर देखील लावले होते.या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा स्वराज्य रक्षक योद्धा असा उल्लेख केला होता.हे बॅनर जिल्हाभर लक्षवेधी ठरले आहेत.