
देवगड : देवगड तालुक्यातील बस स्थानकातील विविध अडचणींबाबत तसेच देवगड आगारात नवीन गाड्या तसेच परिवर्तन गाड्या उपलब्ध करून देण्यात याव्यात .तसेच देवगड बस स्थानकामध्ये पुरुष व महिला स्वच्छता गृहे यांची दुरुस्ती देखभाल करण्यात यावी.अशी मागणी इंटरनॅशनल ह्युमन राइट्स एम्बेसिडर ऑर्गनायझेशन देवगड तालुका या संस्थेच्या वतीने आगार व्यवस्थापक देवगड सहाय्यक वाहतूक निरीक्षक लवु सरवदे यांच्या कडे लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
या वेळी कामगार संघटना प्रतिनिधी अमित रावले उपस्थित होते. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कोकणात गौरी गणपतीचा सण नजीक आला असून हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. देवगड बोरीवली मार्गावर फिरणाऱ्या शयनासनी प्रवासी फेऱ्या वारंवार नादुरुस्त होतात प्रसंगी रद्द केले जातात. त्यामुळे प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळत नाही. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग विभागाकडे १० नवीन शयनासनी गाड्या येणार असल्याचे समजले त्यापैकी दोन गाड्या देवगड आगाराला उपलब्ध करून घ्याव्यात.तसेच अन्य गाड्या जुन्या जीर्ण झाले असून किमान ५ नवीन परिवर्तन गाड्या उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी विशेष प्रयत्न करावे त्याचबरोबर गौरी गणपती सणासाठी येणाऱ्या चाकरमानी ,गणेश भक्तांसाठी बोरीवली मुंबई सेंट्रल कुर्ला ठाणे व या मार्गावर अधिकारी जादा परतीच्या प्रवासी फेऱ्यांचे नियोजन करावे. प्रसंगी गावा गावातून बुकिंग ने ज्यादा फेऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात .अशी मागणी ही देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तसेच देवगड बस स्थानकावर उपलब्ध असलेली प्रसाधन गृहे आगामी येणाऱ्या चाकरमानी गणेश भक्त,व प्रवासी वर्गाला सुस्थितीत व पुरेशा सोयी सुविधांनी उपलब्ध करून देण्यात येऊन या प्रसाधनगृहाची दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी ही लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद तेली, सरचिटणीस रवींद्र कांदळगावकर तालुका उपाध्यक्ष विलास रूमडे कोषाध्यक्ष गिरीश धोपटे, पोलीस विभाग प्रमुख विजय कदम ,शिक्षण विभाग अध्यक्ष तुकाराम तेली ,मीडिया अध्यक्ष दयानंद मांगले, संपर्कप्रमुख रविकांत चांदोसकर सदस्य विजयकुमार जोशी,महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ दीपिका मेस्त्री देवगड तालुका महिला अध्यक्ष सौ दीक्षा तेली, देवगड तालुका महिला सरचिटणीस सौ शामल जोशी इत्यादी उपस्थित होते.