गार्डनमधील परप्रांतीयाकडून चोरीचा प्रयत्न

आधार कार्ड, नोटरीनंतरच न.प.ने द्यावी हंगामी व्यवसायासाठी परवानगी ! | चिमुकल्यांसह शहरवासीयांची सुरक्षा महत्त्वाची : अन्नपूर्णा कोरगावकर
Edited by:
Published on: May 04, 2025 13:42 PM
views 24  views

सावंतवाडी : माजी उपनगराध्यक्षा सौ.‌ अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या निवासस्थानी शिवउद्यान येथे हंगामी व्यवसायासाठी आलेल्या परप्रांतीयाकडून मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नागरिकांना त्या परप्रांतीयास चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, सौ.‌ कोरगावकर यांनी प्रशासनाच लक्ष वेधलं असून हंगामी व्यवसायासाठी उद्यानात येणाऱ्या कामगारांची आधार कार्ड घेऊन नोटरी करूनच ठेकेदाराला मेला लावण्यासाठी ठेका द्यावा. चिमुकली मुले, शहरवासीयांची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. त्यासाठी योग्य ती खबरदारी मुख्याधिकारी, पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री या परप्रांतीय कामगाराकडुन चोरीचा प्रयत्न करण्यात आला. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान शेजारी असलेल्या माजी उप नगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरी हा इसम घुसला. मेल्यात लागलेले गेम्स चालवणारा ठेकेदार फरीद खान यांचा तो मुलगा असून राजू फरीफ खान असं त्याच नाव आहे. त्याने माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून काही साहित्य आस्थाव्यस्थ केले. यावेळी उपनगराध्यक्षांचे पती प्रसाद कोरगावकर यांना चाहूल लागताच त्यांनी बाहेर येऊन पाहिले. यावेळी हा परप्रांतीय चोरी करताना दिसला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने हल्या करण्याचा प्रयत्न केला व दोन मजल्यावरून उडी मारून पळ काढला. यावेळी श्री. कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, अवधूत नाटेकर, रवी जाधव यांनी त्याला शिताफिने पकडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. 

दरम्यान, शहरात हंगामी व्यवसायासाठी येणाऱ्यांना परवानगी देताना त्यांचे आधार कार्ड, नागरिकत्व तपासावे. सर्व परप्रांतीय कामगारांची नोटरी करूनच त्यांना व्यवसायाचा ठेका द्यावा. उद्यानात येणाऱ्या छोट्या मुलांशी ही मंडळी गैरवर्तन करू शकतात. याचीही दक्षता प्रशासनान घेतली पाहिजे.  यासाठी योग्य ती खबरदारी मुख्याधिकारी, पोलीस प्रशासनाने घेऊन चिमुकल्या मुलांसह शहरवासीयांची सुरक्षितता राखावी अशी मागणी उपनगराध्यक्षा सौ. कोरगावकर यांनी केली आहे.