
सिंधुदुर्ग : समाजामध्ये आजही प्रमोद बामणे यांच्यासारखे दाते आपल्या सढळ हस्ताने गरजू गरीब पण हुशार विद्यार्थ्यांबद्दल मनात कायम कणव बाळगून मदत करायला तयार असतात, तुम्ही फक्त मनांपासून अभ्यास करून भविष्यात यशवंत व्हा. असे उद्गार सोशल सर्व्हिस लीग संस्थेच्या जाॅइंट सेक्रेटरी उमाताई शेट्ट्ये यांनी काढले. 15 ऑगस्ट व रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर "अथर्व" फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद बामणे यांच्या वतीने सोशल सर्व्हिस लीग नाईट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज परेल मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच मोफत वह्या वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी बोलतांना प्रमोद बामणे म्हणाले की मी या संस्थेतच शिकलो, त्यांनी केलेल्या संस्कारांची जाणिव ठेवून,समाजकार्यात माझा खारीचा वाटा उचलण्याचा हा अल्पसा प्रयत्न करीत आहे.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक घोडके, भारत म्हाडगूत, मंगेश जगताप, मनिषा कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नलावडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जगताप, विजय सावंत व इतर शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.