
कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली हळवल येथे मालवाहतुक करणाऱ्या टेम्पोचा तीव्र वळणावर अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.हा टेम्पो कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने जात जात असताना रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. आकाश महाजन (रा. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९ सी. ए १२८२) घेऊन .हळवल तिठा येथे हा टेम्पो डाव्या बाजूला पलटी झाला. यात क्लीनर शुभम झोंजाळ (रा. कळे, कोल्हापूर) हा जागीच ठार झाला.
अपघानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. तातडीने महामार्ग पोलिस दाखल होऊन वाहतूक सुरळीत केले तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो हलवून अडकलेल्या शुभम झोंजाळ याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
तीव्र वळणामुळे वारंवार अपघात होत असून महामार्ग प्राधिकरणाने हे तीव्र वळण कमी करता येण्या संदर्भात उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे