विधानसभा अध्यक्षांच संजू परब यांनी केल स्वागत !

शहर विकासासाठी 5 कोटी निधी देणार : अँड. राहुल नार्वेकर
Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2022 20:41 PM
views 504  views

सावंतवाडी : विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांची भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांच्या सरस्वती या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. अँड. नार्वेकर हे खासगी कामानिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी संजू परब यांनी त्यांच अभिनंदन करत असताना सावंतवाडीचे सुपुत्र विधानसभा अध्यक्ष आहेत याचा गर्व असल्याचे गौरवोद्गार काढले. तर यावेळी विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी संजू परब यांच्याकडून शहरातील समस्यांचा आढावा घेतला. तर शहर विकासासाठी ५ कोटी रूपयांचा विशेष निधी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे देणार असल्याचा शब्द दिला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, आनंद नेवगी, विनोद सावंत आदि उपस्थित होते.