कोल्हापुर खंडपीठाच्या ज्वलंत विषयावर विधानसभा अध्यक्षांची प्रदिर्घ चर्चा

अँड. परिमल नाईक यांनी वेधलं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: November 07, 2022 13:58 PM
views 191  views

सावंतवाडी : महाराष्ट्र विधानसभेचे अँड. राहुल नार्वेकर यांची माजी आरोग्य सभापती, नगरसेवक ॲङ परिमल नाईक, उदय नाईक, सुधीर आडीवरेकर यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दुष्टीने सावंतवाडी मोती तलाव संवर्धन, मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, शहरातील नियोजीत नळपाणी योजना, भुयारी गटार योजना, भुमीगत विजवाहीनी योजना, पर्यटन या विषयावर चर्चा केली. तसेच गेली अनेक वर्ष कोल्हापुर खंडपीठ हा जो ज्वलंत विषय आहे त्यावर प्रदिर्घ चर्चा केली. सिंधुदुर्गातील न्यायीक पक्षकार व वकिलांना उच्च न्यायालय खंडपीठ अभावी भेडसावणारे विविध प्रश्न यावेळी उपस्थित केले. त्यास विधानसभा अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर योग्य तोडगा लवकरात लवकर काढण्याचे आश्वसन दिले. त्यावेळी भाजप नेते महेश सारंग, ॲङ परिमल नाईक, उदय नाईक, सुधीर आडीवरेकर, संतोष गवस,  अमीत गवंडळकर, बाळा बोर्डेकर, रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.