सभा राष्ट्रवादीची | भाजपच्या हुकुमशाहीला लोक कंटाळले : व्हिक्टर डांन्टस

Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 13:45 PM
views 139  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. यावेळी ज्येष्ठ नेते व्हिक्टर डांन्टस म्हणाले, कोकणातील माणसं हुशार आहेत. इथे उन्माद चालत नाही. भल्याभल्यांना धुळ चारण्याच काम या मातीतील लोकांनी केलं आहे. ध्यानी मनी नसताना परभाव स्वीकारावे लागलेत. भाजपच्या हुकुमशाहीला लोक कंटाळले आहेत. याचा फायदा आपण घ्यायला हवा. शरद पवार हा विचार घेऊन पुढे जायचं आहे. ८३ वर्षांचा योद्धा मैदानात आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी असाच पुढाकार घ्या, या संधीचा फायदा घ्या. लोकांची खदखद मतदानात परावर्तित करा असं आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.