
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून जोरदार तयारी सुरु असून याचाच एक भाग म्हणून बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्ही. व्ही, प्याड मशिन मिळून साडेचार हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तपासणी करुन सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याची मतदार संघ निहाय वर्गिकरण प्रक्रिया पूर्ण होऊन ही यंत्रे त्या-त्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर आला असून २० नोव्हेंयर ला मतदान व २३ नोव्हेंबर ला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून सर्व प्रकारची पूर्व तयारी सुरु असून जिल्ह्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी ९२१ मतदान केंद्रे निश्चित केलेली आहेत, त्यासाठी लागणारा साडेचार हजार निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता मतदानासाठी लागणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तपासणी करुन ती सीलबंद करून सज्ज ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये बॅलेट युनिट २०९३, कंट्रोल युनिट ११७१ आणि व्ही. व्ही, पेंट मशिन १२६२ अशी एकूण ४ हजार ५२६ मतदान यंत्रे सज्ज ठेवली आहेत. याची आता मतदार संघ निहाय वर्गिकरण करुन त्या-त्या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार आहेत, मतदान यंत्रे सज्ज ठेवताना बॅलेट व कंट्रोल युनिट १२० टक्के आणि व्ही. व्ही. पेंट मशिन १३० टक्के सज्ज केली आहेत. अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघ निहाय ४६ मतदान यंत्रे अतिरिक्त ठेवण्यात आलेली आहेत.