
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अधिसूचना प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात एका उमेदवाराने दोन नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी वैभव विजय नाईक, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी दोन अर्ज दाखल केले आहे अशी माहिती जिल्हा निवडणुक शाखेमार्फत देण्यात आली आहे.